Latest

मुंबई डायरीज २६/११ चा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित!

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबई डायरीज २६/११ चा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला आहे. मुंबई डायरीज २६/११ टीझर मध्ये हल्ल्याच्या कथानकावर भाष्य करण्यात आलं आहे. आत्ताच्या काळात डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून रात्रं-दिवस नि:स्वार्थीपणे काम केलं जात आहे. लोकांचे जीव वाचवताना पाहिले आहे. विशेषत: अशा कठीण काळात या खऱ्याखुऱ्या हिरोंशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही.

अधिक वाचा-

निखिल अडवाणी यांनी या दिग्दर्शन केलं आहे. एमी एंटरटेंमेंटच्या मोनिशा अडवानी आणि मधू भोजवानी यांची निर्मिती आहे. ही मालिका मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या आतंकवादी हल्ल्यावर आधारित आहे.

अधिक वाचा-

शहीद झालेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या शूरतेची व धाडसाची कथा सांगते. आतंकवादी हल्ल्यादरम्यान निस्वार्थीपणे अनेक लोक कार्यरत होते.

अधिक वाचा-

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईकरांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश होता. आतापर्यंत प्रकाशात न आलेली कहाणी ह मालिका अधोरेखित करते.

दिग्गज कलाकारांच्या भूमिका 

कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धन्वंतरी यांच्या यात भूमिका आहेत. तसेच सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलवडी यांच्याही भूमिका आहेत.

हा शो ९ सप्टेंबर २०२१ रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओजवर पाहायला मिळेल. २४० हून अधिक देशांमध्ये हा शो प्रदर्शित होणार आहे.
ही कथा आतंकवादी हल्ल्यातील मुंबईकरांमधील एकजूट दाखवणारी रात्र उभी करते.

या मालिकेमध्ये शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कार्य यावर भाष्य करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसमोरील आव्हाने काय होती. त्यावर कर्मचाऱ्यांनी केलेली मात याविषयी भाष्य शोमध्ये केले आहे.

पाहा व्हिडिओ-Mumbai Diaries 26/11 – Official Teaser

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT