Latest

मुंबई, ठाण्यातील शाळा स्फोटात उडवून देण्याची धमकी

Shambhuraj Pachindre

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

ठाणे पोलिस स्कूलच्या कार्यालयीन मेल आयडीवर एक धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. त्यात मुंबई आणि ठाण्यातील शाळा, महाविद्यालये तसेच रेल्वेस्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

'लष्कर-29लष्कर22प्रोटॉनमेल डॉट कॉम' या ई-मेल आयडीवरून ही धमकी देण्यात आली आहे. त्यात डोंबिवलीतील 12 मराठी नागरिकांची नावे देण्यात आली आहेत. ज्या नागरिकांची नावे देण्यात आली आहेत त्याखाली, 'इनको कम मत समजना, इनमे से हर एक मुजाहिद हजारो लोगो की ताकद रखता है,' असे लिहिले आहे. विशेष म्हणजे, हा मेल मराठी व हिंदी या दोन्ही भाषांत टाईप केलेला आहे. सायबर पोलिस, ठाणे क्राईम ब्रँच आणि ठाणेनगर पोलिस या घटनेचा कसून तपास करीत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

ठाणे शहर पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे पोलिस स्कूलच्या अधिकृत ई-मेल आयडीवर 21 जानेवारी 2022 रोजी 5.37 वाजण्याच्या सुमारास हा धमकीचा मेल प्राप्त झालेला आहे. रविवारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पोलिस स्कूलमध्ये होणार होती. त्यामुळे या शाळेतील एक शिक्षिका शनिवारी शाळेची पाहणी करण्यास आली होती. त्यानंतर कामकाज आवरून शाळेच्या ई-मेल आयडीवर काही सूचना, संदेश आला का ते पाहण्यासाठी शिक्षिकेने लॅपटॉपवर ई-मेल आयडी उघडला असता त्यावर 'मिशन 22' असा विषय लिहिलेला एक मेल आल्याचे तिने पाहिले. शिक्षिकेने मेल उघडला असता हा प्रकार उघडकीला आला.

कुर्बानी और धमाका

मेलमधील मजकूर असा आहे, 'मै जावेद खान लष्कर 29 का प्रमुख होने के नाते मेल भेज रहा हूँ. हमारा एकही मक्सद है पुरे हिंदुस्थान मे जिहाद का पालन हो. तभी यह देश प्रगती करेगा. इस लिए हमने दो मार्गो का स्वीकार किया है, कुर्बानी और धमाका. हम पुरी दुनिया को दिखाना चाहते है की जिहाद सिर्फ एक नहीं बल्की सभी धर्मो के लोगो के लिये है, हम चाहते है की पुलीस हमे पकडे, मीडिया के सामने हमारे विचार लोगो तक पहुचे इसलीये हम अपनी जान की कुर्बानी देने के लिये भी तैयार है.'

SCROLL FOR NEXT