Latest

मिरजेच्या श्रद्धाने पंतप्रधानांना दिले तिकीट

सोनाली जाधव

पुणे : 'अनपेक्षितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी असलेल्या तिकीट खिडकीजवळ येऊन तिकिटाची मागणी केली. मी आणि माझ्या समवेत असलेले अधिकारीही काही क्षण स्तब्ध झालो. काही क्षणांनंतर तुम्ही शुल्क कशा प्रकारे भरणार, असे मी विचारले? त्यावर त्यांनी पर्याय सांगितला. मी या प्रसंगाने भारावून गेले आहे, हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे…' असे सांगली जिल्ह्यातील मिरजेची युवती श्रद्धा सरवदे सांगत होती.

पंतप्रधानांनी तिकिटाचे 20 रुपये यूपीआय पद्धतीने दिले आणि 'धन्यवाद' म्हणून ते मार्गस्थ झाले. हा प्रसंग लाईव्ह दाखविला जात असल्याने मला कुटुंबीय आणि परिचयाच्या लोकांचे अभिनंदनाचे फोन सुरू झाले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचा संवादाचा अनुभव संस्मरणीय होता, असे श्रद्धाने सांगितले.

SCROLL FOR NEXT