Latest

‘माणिके मागे हिते’वर थिरकरणार नोरा फतेही

Arun Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुलप्रीत सिंग यांच्या आगामी 'थँक गॉड'चा फर्स्ट लूक रीलिज करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये अजय देवगणचा रावडी लूक दिसत असून एका सोनेरी रंगाच्या सिंहासनावर काळ्या कपड्यांमध्ये काळ्या गॉगलसह अजय दिसून येत आहे.

या चित्रपटात अजय देवगणने चित्रगुप्ताची भूमिका साकारल्याचे समजते, जो सर्वांच्या पाप-पुण्याचा हिशेब लिहून ठेवतो. हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

अजय आणि रकुल यानिमित्ताने तिसर्‍यांदा स्क्रीन शेअर करत आहेत. यापूर्वी 'दे दे प्यार दे' आणि 'रन वे 34' या चित्रपटांत दोघांनी एकत्र काम केले आहे. या चित्रपटात नोरा फतेही ही यू ट्यूब सेन्सेशन योहानी या श्रीलंकन गायिकेच्या 'माणिके मागे हिते' या सुपरहिट गाण्याच्या हिंदी व्हर्जनवर थिरकताना दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. इंद्रकुमार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, अजय देवगणचे आगामी काळात 'मैदान', 'रेड 2', 'सिंघम 3', 'भोला', 'द‍ृश्यम 2' इत्यादी चित्रपट येणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT