वॉशिंग्टन ; 'टेस्ला' आणि 'स्पेस एक्स'सारख्या कंपन्यांचे कल्पक व धडाडीचे उद्योजक एलन मस्क अनेकवेळा अनोख्या संकल्पना मांडत असतात. आताही त्यांनी एक नवी संकल्पना मांडून जगाला थक्क केले आहे. भविष्यात एक दिवस असा येईल की त्यावेळी माणसाचा मेंदू यंत्रमानवात डाऊनलोड करता येईल, असे त्यांनी म्हटले आहे. अशाप्रकारे माणूस 'अमर' होऊ शकेल असे त्यांचे म्हणणे आहे.
आपण अनोख्या वाटणार्या अनेक गोष्टींना डाऊनलोड करू शकतो. भलेही माणसाचे ते शरीर नसेलही. कदाचित हा फरक असू शकतो. मात्र, आपल्या आठवणी, व्यक्तिमत्त्वाचा विषय येतो, त्या पातळीवर हे करता येऊ शकेल. अशा प्रकारचे तंत्रज्ञान आजच्या संगणकीय मेमरीच्या विकासाचा एक टप्पा ठरेल.
आपल्या आठवणी मोबाईल-संगणक, चित्र आणि व्हिडीओच्या रूपाने संग्रहित असतात. संवादाची क्षमता वाढवण्याचे काम संगणक व फोनद्वारे होते. त्यामधून जादुई वाटाव्यात अशा अनेक गोष्टी करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. मानवी मेंदूला संगणकासोबत आधीच मोठ्या प्रमाणात विकसित करण्यात आले आहे.
मानवी चेतनेला एखाद्या कृत्रिम शरीरात डाऊनलोड करून जीवनकाळ वाढवण्याची कल्पना विज्ञानकथांमध्ये येऊन गेलेली आहे. एलन मस्क सध्या एका ह्युमनॉईड रोबो ऑप्टिमसवर काम करीत आहेत. त्याचा प्रोटोटाईप 2022 च्या अखेरीस तयार होईल. 2023 पासून त्याच्या व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात होईल.