Latest

माझ्या हृदयात ९५ टक्के ब्लॉकेज होते : सुश्मिता सेन

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : माझ्या हृदयात ९५ टक्के ब्लॉकेज होते, असे अभिनेत्री सुश्मिता सेन हिने इन्स्टाग्राम लाईव्हवेळी सांगितले. मोठ्या प्रमाणात ब्लॉकेज असूनही जिम, वर्कआऊट आणि सुदृढ लाईफस्टाईलमुळे मी लवकर बरी झाली. नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तेव्हा त्याबद्दल कुणालाही सांगण्यात आले नव्हते. त्यावेळी आजाराबद्दल कुणाला कळावे असे मला वाटत नव्हते.

सध्या अनेकांना लहान वयात हार्टअटॅक येत आहेत. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या तब्येतीची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन सुश्मिता हिने यावेळी केले. आजारानंतर पहिल्यांदाच सुश्मिताने सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना तब्येतीची माहिती दिली. सध्या मला ताप आला आहे. त्यामुळे घसा दुखत असल्याचेही सुश्मिताने यावेळी सांगितले.

SCROLL FOR NEXT