Latest

माचू पिच्चू… इंका संस्कृतीचे एक सुंदर शहर

Arun Patil

न्यूयॉर्क : दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात प्राचीन इंका संस्कृतीमधील एका सुंदर शहराचे अवशेष आजही पाहायला मिळतात. त्याचे नाव आहे माचू पिच्चू. जगातील सात आश्चर्यांच्या यादीत माचू पिच्चूचा समावेश होतो. पेरू देशातील कुज्को क्षेत्रात हे शहर आहे. कुज्कोपासून 80 किलोमीटरवर 2430 मीटर उंचीच्या पर्वतावर हे शहर आहे.

या ऐतिहासिक शहराला 'इंका लोकांचे हरवलेले शहर' असेही म्हटले जाते. इसवी सन 1430 मध्ये इंका संस्कृतीमधील लोकांनी हे शहर वसवले व ते त्यांच्या राजधानीचेच शहर बनले. मात्र, शंभर वर्षांनंतर स्पेनच्या लोकांनी इंका लोकांवर विजय मिळवला आणि त्यांनी हे शहर असेच सोडून दिले. या ठिकाणाबाबत अनेकांना ठाऊक होते; पण त्याला जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी हिरम बिंघम यांनी योगदान दिले. 1983 मध्ये माचू पिच्चूला युनेस्कोच्या जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. 7 जुलै 2007 मध्ये जगातील सात आश्चर्यांच्या नव्या यादीतही त्याचा समावेश करण्यात आला.

SCROLL FOR NEXT