Latest

महाराष्ट्राला एक इंचही भूमी देणार नाही; कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची दर्पोक्ती

दिनेश चोरगे

बंगळूर वृत्तसंस्था : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. कर्नाटककडून काही गावे काय, तर एक इंचही भूमी महाराष्ट्राला देणार नाही, अशी दर्पोक्ती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दुर्योधनाच्या थाटात शुक्रवारी केली. कोणतीही तडजोड आम्ही करणार नाही, असेही बोम्मई बरळले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापुरातील काही गावांवर दावा ठोकल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना महाराष्ट्रातील ट्रकवर बेळगावात हल्ला झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून याबाबत चर्चा केली होती. यानंतरही मुख्यमंत्री बोम्मई यांचा आडमुठेपणा कायम आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा वाद सोडवण्यासाठी गृहमंत्री शहा यांच्याकडे मध्यस्थी करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत माध्यमांकडून विचारणा करण्यात आली असता बोम्मई यांनी वरीलप्रमाणे उद्दाम उत्तर दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT