Latest

महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या १५,५११ पदांच्या भरतीस मान्यता

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची 15 हजार 511 पदांची भरती अखेर जाहीर झाली आहे. राज्य शासनाचे साधारणपणे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. चार-पाच वर्षांपासून राज्यातील भरतीप्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे.

ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विविध खात्यांतील रिक्‍त पदांची माहिती तत्काळ संकलित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. या भरतीची घोषणा त्यांनी विधिमंडळ अधिवेशनातच केली होती. त्यानुसार गट अ, गट ब व गट क श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देण्यात आली आणि 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता मिळाली.

मुख्यमंत्र्यांचेही निर्देश

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला सादर झालेले नाहीत. त्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागांतील विविध अभियंता अशा विविध पदांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पदांच्या मुख्य परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या 3 हजार 664 उमेदवारांच्या उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती होणार आहेत. पुणे आणि नाशिक शहरांत या मुलाखती दोन टप्प्यात होतील. 4 ऑक्टोबरपासूनचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. https://impsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे मुलाखत कार्यक्रम आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT