Latest

मंगळावर एलियन्सचा अड्डा, पण ‘नासा’नं माहिती लपवली

Arun Patil

न्यूयॉर्क : एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांबाबत सातत्याने उलटसुलट दावे करण्यात येत असतात. जगभरात काही 'यूफो हंटर्स'ही आहेत जे 'यूफो' किंवा 'एलियन्स'बाबत स्वतःच्या मार्गाने काही अभ्यास करून वेगवेगळे दावे करतात. आता अशाच एका 'यूफो' संशोधकाने म्हटले आहे की मंगळावर एलियन्सचा अड्डा आहे.

आपण लाल ग्रहावरील हा 25 किलोमीटर रुंदीचा अड्डा शोधला असल्याचाही त्याचा दावा आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा' या अड्ड्याची माहिती जगापासून लपवून ठेवत असल्याचेही त्याचे म्हणणे आहे.

या माणसाचे नाव आहे स्कॉट व्ही. वॉरिंग. त्यांनी 'यूफो' व 'एलियन्स'बाबत वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी मंगळभूमीवर एक आयताकृती वस्तू पाहिली आहे. सुल्सी गोर्डी नावाच्या ठिकाणी ही वस्तू आहे. याबाबतची माहिती जगाला समजू नये असे 'नासा'ला वाटत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी चिनी रोव्हरनेही एखाद्या पेटीसारख्या दिसणार्‍या आयताकृती वस्तूचे छायाचित्र टिपले होते. मात्र, जवळ गेल्यावर हा सशाच्या आकाराचा एक दगड असल्याचे दिसून आले होते. जगभरातील एलियन्सवादी आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी वेगवेगळे तर्क देतच असतात. यापूर्वी एका यूफो रिसर्चरने अंटार्क्टिकामध्ये एलियन्सचा छुपा अड्डा असल्याचेही म्हटले होते. 'नासा'ला एलियन्सबाबतची सर्व माहिती असल्याचाही त्याचा दावा होता.

SCROLL FOR NEXT