भोपाळ, वृत्तसंस्था : जागतिक तापमान वाढीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी राजा भोज विमानतळापासून 20 किलोमीटर अंतरावर आशियातील सर्वात मोठे अॅटमॉस्फेरिक (हवामान केंद्र) संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या टप्प्यात 300 किलोमीटर दूर अंतरावरील हवामान क्षेत्र येणार आहे. ढग कधी आणि कुठे कोसळणार? गारा किती पडणार ते पाऊस किती पडणार, याची माहिती अगोदरच समजण्यास मदत होणार आहे.
या केंद्रात फिनलंडमधून आयात केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये समुद्री सपाटीपासूनचे अंतर, मॅट्रिक रडार आणि केयू बँड रडार बसवण्यात आले आहे. रडारच्या माध्यमातून संशोधकांना मान्सूनच्या स्थितीची माहिती मिळणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (पुणे) या केंद्राचे मुख्यालय असेल. या केंद्राचा लाभ विद्यार्थ्यांना संशोधनासाठी होणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. पुढील महिन्यात या केंद्राचे औपचारिक उद्घाटन होईल. या केंद्रात पुणे, बंगळूर, कोलकातासह देशातील शहरातील संशोधक काम करत आहेत.
वायुमंडलातील हवेची स्थिती समजणार
या केंद्रात वारा आणि हवेचे निरीक्षण करणारे रडारही बसवण्यात आले आहे. याद्वारे जमिनीपासून 12 किलोमीटर उंचीवर वायुमंडलातील हवेची स्थिती, त्यामध्ये किती आर्द्रता आहे, याची माहिती मिळणार आहे.