Latest

भूपेंद्र पटेल यांचा आज गुजरात मुख्यमंत्रीपदी शपथविधी

दिनेश चोरगे

गांधीनगर : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांचा सोमवारी शपथविधी होत आहे. विक्रमी विजयामुळे हा सोहळा शानदार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शपथविधी कार्यक्रम होणार आहे.

156 जागांवर विक्रमी विजय मिळवत गुजरातचा गड काबीज केलेल्या भाजपने भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्रिपदी निवडले आहे. सोमवारी दुपारी 2 वाजता शपथविधीचा सोहळा होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT