Latest

भारतीय फुटबॉल संघात कोल्हापूरचा फुटबॉलपटू अनिकेत जाधवची निवड

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : क्रीडानगरी कोल्हापूरचा युवा फुटबॉलपटू व 'आयएसएल' लीग स्पर्धेतील विजेता हैदराबाद एफसी संघातील फॉरवर्ड अनिकेत जाधव याची निवड भारतीय फुटबॉल संघात झाली आहे. बहरिन येथे होणार्‍या दोन सामन्यांच्या मैत्रीपूर्ण मालिकेसाठी भारतीय संघाच्या अंतिम 25 जणांच्या संघाची घोषणा सोमवारी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने केली. वरिष्ठ गटात व अंतिम संघात निवड होणारा तो पहिला कोल्हापूरकर ठरला आहे.

शतकी परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉलला आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळवून देण्याची कामगिरी अनिकेत जाधव याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर केली आहे. सन 2017 ला त्याने भारतात झालेल्या 17 वर्षांखालील युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात स्थान मिळविले होते. यानंतर त्याने 2018 ची 'आयएसएल' लीग स्पर्धाही गाजविली.

जमशेदपूर एफसीचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी करत हैदराबाद एफसी संघात स्थान मिळविले. मिडफिल्डर म्हणून खेळत अनिकेतने आयएसएल लीगमध्ये अनेक गोलची नोंद केली. अनिकेतच्या या संपूर्ण कामगिरीची दखल घेऊन भारतीय फुटबॉल महासंघाने त्याचा समावेश भारतीय संघात केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT