नांदेड; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा सोमवारी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मदनूर नाका येथे सोमवारी सायंकाळी 7 वाजता पोहोचणार आहे.
राहुल गांधी राज्यात दोन जाहीर सभा घेणार आहेत. नांदेड जिल्ह्यात 10 नोव्हेंबर रोजी पहिली, तर दुसरी सभा 18 नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे होणार आहे. 15 विधानसभा, 6 लोकसभा मतदारसंघांतून भारत जोडो यात्रेचा प्रवास आहे.