Latest

भारत गॅस ग्राहकांना मिळणार १०० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक

मोहन कारंडे

गुरुग्राम/मुंबई; वृत्तसंस्था : सणासुदीच्या काळात एलपीजी सिलिंडरचे बुकिंग केल्यास भारत गॅस ग्राहकांना 100 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. ही योजना 31 डिसेंबर 2022 पर्यंत वैध आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)ने चे मोबिविक अ‍ॅपच्या माध्यमातून एलपीजी सिलिंडर रिफिलिंगसाठी डिजिटल पेमेंट करण्यासाठी देशातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे मोबाईल वॉलेट असलेल्या मोबिलिकबरोबर भागीदारी केली आहे. त्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार असल्याचे बीपीसीएलच्या डिजिटल पेमेंटस्च्या डेप्युटी जनरल मॅनेजर मोना श्रीवास्तव यांनी सांगितले. भारत पेट्रोलियम ही दुसरी सर्वात मोठी भारतीय तेल विपणन कंपनी असून, देशभरात तिचे 8 कोटींहून अधिक एलपीजी ग्राहक आहेत. सध्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त भारत गॅस ग्राहक डिजिटल पद्धतीने पैसे देतात. मोबिविकसोबतच्या भागीदारीने आणखी एका डिजिटल पेमेंट पर्यायाची भर पडली आहे, असे बीपीसीएलचे एचक्यू, विक्री आणि एलपीजी विपणन धोरण विभागाचे सीजीएम निखिल सिंग यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT