Latest

भायखळा मंडईचे होणार पाडकाम; गाळेधारकांना पर्यायी व्यवस्था नाहीच

सोनाली जाधव

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी भायखळा पूर्वेकडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड लगत असलेकी संत गाडगे महाराज मंडईची इमारत पुढील आठवड्यात पाडण्यात येणार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी येथील गाळेधारकांना पर्यायी जागा देणे अपेक्षित होते. मात्र याकडे पालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गाळेधारकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

भायखळा पूर्व स्टेशन शेजारील आणि रेल्वे पटरीला लागून असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील रेल्वेपूल धोकादायक झालेला आहे. त्यामुळे तो पाडून तेथे नव्याने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या उड्डाणपुलाच्या कामात भायखळा स्टेशन लगत असलेली संत गाडगे महाराज महापालिका मंडई अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे या मंडईची इमारत तोडण्यात येणार आहे. यात ३९ गाळे बाधित होत आहेत. याव्यतिरिक्त दहा पेक्षा जास्त गाळ्यांचा निम्म्यापेक्षा जास्त भाग बाधित होणार आहे. त्यापैकी ३९ गाळ्यांना पर्यायी जागा देण्याचे महापालिकेने मान्य केलेले असताना अद्यापपर्यंत या गाळेधारकांना पर्यायी जागा देण्यात आलेल नाही. सुमारे पाच महिन्यापूर्वी पालिकेने या मंडईच इमारत तोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र येथील संत गाडगे महाराज मंडई व भाजीपाला व्यापारी महासंघ भायखळा फ्रुट असोसिएशन आणि संत गाडगे महाराज व्यापारी असोसिएशन यांनी हायकोर्टात धाव घेतली. यावेळी कोर्टाने पालिकेच्य कारवाईवर स्थगिती आणली.

भायखळा : गाळेधारकांचं मोठे नुकसान होणार

अखेर हायकोर्टाने १८ नोव्हेंबरला गाळेधारकांना त्यांच्या सध्याच्या गाळे क्षेत्रफळाच्या तुलनेत २० ते ४० टक्के कमी क्षेत्रफळ देऊन तेथेच पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश दिल्याचे व्यापारी संघटनेकडून सांगण्यात आले. परंतु मुंबई महानगरपालिकेने ५० ते ६० टक्के क्षेत्रफळ कमी केले. त्यामुळे गाळेधारकांचं मोठे नुकसान होणार आहे. सध्याचं गाळ्याचे क्षेत्रफळ १२० ते १३० चौरस फूट इतके असून या ५० ते ६० टक्के कपात झाल्यास गाळेधारकांना ६० ते ७० चौरस फूट जागा आपल्या व्यवसायासाठी मिळणार आहे. या मंडळी भाजीपाला व फळे विक्रेते असून पालिकेच्या या धोरणामुळे त्यांच्यावर मोठ्या अन्याय होणार आहे. त्यामुळे गाळेधारकांना पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय इमारत पाडण्यात येऊ नये, अशी विनंती व्यापारी संघटनेने केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT