Latest

विधान परिषद निवडणूक : भाजपचे सर्व आमदार शनिवारपासून ‘ताज’मध्ये

अमृता चौगुले

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : विधान परिषद निवडणुकीतील दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. क्रॉस व्होटिंगचा फटका बसू नये म्हणून भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. भाजपच्या आमदारांना निवडणुकीच्या दोन दिवस आधीच ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये हलविण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवारी सर्व आमदारांना मुंबईत हजर होण्यास सांगण्यात आले आहे.

विधान परिषदेच्या एका जागेसाठी 26 ते 27 आमदारांच्या मतांचा कोटा आवश्यक असणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार, काँग्रेसचा एक, तर भाजपचे चार उमेदवार सहज विजयी होणार आहेत. मात्र, दहाव्या जागेसाठी काँग्रेस उमेदवार भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात चुरशीची लढत आहे. त्यामुळे आमदार फुटू नयेत म्हणून भाजपकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT