Latest

बेळगाव : तरुणीची फसवणूक, तिघांंना अटक

अमृता चौगुले

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : बेळगाव येथील एका ग्रामीण भागातील तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिला वाममार्गाला लावण्यात आले होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने या तरुणीची सुटका करून तिघांना अटक करण्यात आली आहे.

मूळ बैलहोंगल तालुका व सध्या अनगोळ येथे राहणार्‍या विराप्पा नामक तरूणाचे तालुक्यातील कलखांब येथील तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. यानंतर त्याने तिला वर्षापूर्वी शहरातील अनगोळ येथे आणून ठेवले. यानंतर त्याने सदर तरुणीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत तिची फसवणूक केल्याची तक्रार आठ दिवसांपूर्वी महिला पोलिस ठाण्यात झाली.

त्यानंतर महिला ठाण्याच्या निरीक्षक श्रीदेवी पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी अनगोळ येथे जाऊन सदर तरुणीची सुटका केली. या प्रकरणी मारुती व आणखी दोघांना अटक झाली. तरुणीची सुटका करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, शिवकन्या पाटील, प्रमोदा हजारे यांचे सहकार्य लाभले.

SCROLL FOR NEXT