Latest

बीसीसीआयने IPL साठी दोन संघाचे टेंडर, बेस प्राईस ऐकून भुवया उंचावतील

Arun Patil

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : आयपीएल २०२२ साठी बीसीसीआयने मोठी तयारी सुरू केली आहे. पुढच्या हंगामात आयपीएलमध्ये दोन टीम वाढणार आहेत, यासाठी लवकरच टेंडर काढण्यात येतील, पण १० टीम झाल्यामुळे टीमचा फॉरमॅट बदलला जाणार आहे.

बीसीसीआयने आयपीएल २०२२ साठी दोन नवीन संघांचा समावेश करण्यासाठी टेंडर काढले आहे.

हे टेंडर खरेदी करण्याची अंतिम तारीख ५ ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या मते, हे टेंडर डॉक्यूमेंट १० लाख रुपयांना खरेदी करता येईल.

याशिवाय बीसीसीआयने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की,

बोली सादर करण्यासाठी कोणत्याही कंपनीला टेंडर आमंत्रण अर्थात आयटीटी खरेदी करण्याची देखील आवश्यकता असेल.

बीसीसीआयने टेंडर प्रसिद्ध करताना सांगितले की, नवीन संघ खरेदी करण्यासाठी मूळ किंमत २००० कोटी ठेवण्यात आली आहे.

अशा स्थितीत बीसीसीआयला दोन्ही नवीन संघांकडून सुमारे ५ हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

सध्या आयपीएलमध्ये आता आठ संघ खेळवले जात आहेत. या नवीन दाेन टीममुळे पुढील हंगामात १० संघ खेळवले जातील.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही बोली प्रक्रिया अंतिम स्वरूपात झाली आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "कोणतीही कंपनी १० लाख रुपये देवून बोली दस्तऐवज खरेदी करू शकते.

यापूर्वी दोन नवीन संघांची मूळ किंमत १७०० कोटी रुपये मानली जात होती.

परंतु आता मूळ किंमत २००० कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयपीएलच्या आर्थिक बाजूकडे लक्ष देणाऱ्या एका सूत्राने सांगितले की, जर बोली प्रक्रिया ठरल्याप्रमाणे झाली तर बीसीसीआयला किमान ५००० कोटी रुपयांचा नफा होईल.

कारण अनेक कंपन्या या बोली प्रक्रियेत रस दाखवत आहेत.

आयपीएलच्या पुढील हंगामात ७४ सामने होतील आणि आणि ती सर्वांसाठी फायदेशीर स्थिती असेल.

आयपीएलच्या दोन नव्या टीम निश्चित झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा नव्याने खेळाडूंवर बोली लागेल.

एक परदेशी खेळाडू

प्रत्येक टीमला जास्तीत जास्त ४ खेळाडू रिटेन करता येतील. या ४ खेळाडूंपैकी तीन भारतीय तर एक परदेशी किंवा दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.

बीसीसीआयने लिलावादरम्यान टीमच्या लिलावात खर्च करण्याच्या रक्कमेत वाढ करणार आहे.

या लिलावादरम्यान पहील्यांदा एक टीम जास्तीत जास्त ८५ कोटी रुपये खर्च करू शकत होती, पण यंदा मात्र या टीमना ९० कोटी रुपये खर्च करता येतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT