Latest

बारावी परीक्षेत पुणे विभागात सोलापूर अव्वल

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  बारावी परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल 94.15 टक्के लागला आहे. पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. यंदाही परीक्षेत मुलींनीच (98.83 टक्के) बाजी मारली आहे. विज्ञान शाखेचा सर्वाधिक 98.83 टक्के, तर तंत्रविज्ञान शाखेचा सर्वात कमी 83.33 टक्के निकाल लागला आहे.

आयुष्याचे महत्त्वपूर्ण वळण असलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची पालकांसह विद्यार्थ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. त्याचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्यातून एकूण 54 हजार 792 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोेंदणी केली होती. यापैकी 54 हजार 419 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात 22 हजार 734 मुली व 31 हजार 745 मुलांचा समावेश होता. एकूण 51 हजार 293 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 21 हजार 850 मुली आणि 29 हजार 443 मुलांचा समावेश आहे. राज्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही मुलीनेच बारावी परीक्षेत यंदाही बाजी मारली आहे.

यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 96.11 टक्के मुली तर 92.75 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल 98.83 टक्के लागला असून विज्ञान शाखेत मुलींचा निकाल 99.16 टक्के लागला आहे.

कॉमर्स शाखेचा निकाल 92.55 टक्के लागला असून कॉमर्स शाखेचा मुलांचा निकाल 90. 18 टक्के तर मुलींचा निकाल 95.18 टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल 90.57 टक्के लागला असून कला शाखेत 89 टक्के मुलांचा तर 93.17 टक्के मुलींचा निकाल लागला आहे.

व्होकेशनल शाखेचा निकाल 88, 43 टक्के लागल असून यामध्ये 88 .70 टक्के मुलांचा तर 89.65 टक्के मुली ंचा निकाल लागला आहे.
तंत्र विज्ञान शाखेचा निकाल 83.33 टक्के लागला असून तंत्र विज्ञान शाखेत मुलांचा 83 .33 टक्के निकाल लागला आहे.
कोरोना परिस्थितीमुळे मागील दोन वर्षात बारावीची परीक्षा घेताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. एका वर्षात परीक्षा न घेताच अंतर्गत मूल्यांकन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला होता.दहावीच्या परीक्षेबाबतही असाच गोंधळ होता.

यंदाच्या बारावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल चांगला लागला आहे. कोरोना परिस्थितीत मुलांच्या अभ्यासक्रमात सातत्याने अडथळे निर्माण झाले होते. या अडचणीवर मात करून जिल्ह्यातील मुलांनी परीक्षेत चांगले यश संपादन केल्याने सर्वत्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

बारावीची परीक्षा एक द़ृष्टिक्षेपात

54 हजार 792 मुलांची परीक्षेसाठी नोंदणी 54 हजार 449 मुलांनी दिली प्रत्यक्षात परीक्षा मुलींचा निकाल 96.11, तर मुलांचा निकाल 92.75 टक्के निकाल 51 हजार 229 मुले उत्तीर्ण विज्ञान शाखेचा 98.83 टक्के निकाल
वाणिज्य शाखेचा 92.55 टक्के निकाल कला शाखेचा 90.57 टक्के निकाल

SCROLL FOR NEXT