Latest

प्रियांकाच्या आग्रहावरून आलिया, कॅटरिना राजी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता फरहान अख्तरने या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या आगामी 'जी ले जरा' या चित्रपटाची घोषणा केली होती. फरहान या चित्रपटाद्वारे पुन्हा दिग्दर्शन करत आहे. त्याच्या दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या 'दिल चाहता है'सारखेच काहीसे कथानक 'जी ले जरा'चेही असणार आहे, फक्त यामध्ये मुलांच्या ऐवजी मुलींची रोड ट्रीप पाहायला मिळणार आहे. फरहानची बहीण दिग्दर्शिका झोया अख्तरही या प्रोजेक्टशी जोडली गेली आहे. या चित्रपटात प्रथमच प्रियांका चोप्रा-जोनास, कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट एकत्रित दिसणार आहेत.

नुकतेच झोयाने एका मुलाखतीत या तिघी या चित्रपटासाठी कशा एकत्र आल्या ते सांगितले. झोया म्हणाली की, फरहानने मला केवळ एका ओळीची कथा ऐकवली होती; फरहानला याच तिघी या चित्रपटासाठी हव्या होत्या. मग मी प्रत्येकीशी स्वतंत्रपणे काँट्रॅक्ट केले. तथापि, प्रियांकाच्या आग्रहामुळेच कॅटरिना आणि आलिया चित्रपटासाठी राजी झाल्या. दरम्यान, झोया अख्तर, रिमा कागती आणि फरहान या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. पुढील वर्षात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT