Latest

पोलिस येताच इम्रान खान गायब!

backup backup

लाहोर : वृत्तसंस्था तोशाखाना (सरकारी खजिना घोटाळा) प्रकरणातील अपहार प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना केव्हाही अटक होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. रविवारी पोलिस खान यांच्या घरी पोहोचलेही होते, पण खान गायब झाले. पोलिस नोटीस देऊन परत गेले.

दुसरीकडे इम्रान खान यांना अटक करण्यासाठी आम्ही गेलोच नव्हतो. त्यांना अटक करायचीच असती, तर आम्हाला कोण रोखू शकले असते? आम्ही इम्रान खान यांना भेटलोही नाही. नोटीस बजावली आणि निघून आलो. इम्रान खान यांच्या वतीने माजी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ही नोटीस स्वीकारली. पोलिस निघून गेल्यानंतर इम्रान खान यांनी लाहोरमध्ये त्यांच्या समर्थकांसमोर भाषणही केले. आमचे गृहमंत्री भीक मागत जगभर फिरत आहेत. पाकिस्तानचा इतका अपमान आजवर कधीही झाला नाही. 16 अब्जांचा घोटाळा केल्याप्रकरणी ज्याला शिक्षा होणार होती, तो शाहबाज शरीफ या देशाचा पंतप्रधान बनतो. आठ खुनांचा आरोपी गृहमंत्री बनतो, असे ते म्हणाले.

इम्रान खान यांना अटक केल्यास पाकिस्तानमधील आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठे आंदोलन होईल.
– फवाद चौधरी,
नेते, पीटीआय

काय आहे प्रकरण?

इम्रान यांनी तोशाखान्यातून 2.15 कोटी रुपयांत भेटवस्तू विकत घेतल्या होत्या. त्याची विक्री केल्यावर मला 5.8 कोटी रुपये मिळाले, असे निवडणूक आयोगाला इम्रान यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात भटेवस्तूंच्या विक्रीतून इम्रान यांना मिळालेली रक्कम 20 कोटींहून अधिक असल्याचे चौकशीअंती समोर आले. त्यावरून इम्रान यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाने बजावलेले आहे.

SCROLL FOR NEXT