Latest

पुण्याकडे परतणाऱ्या वाहनांच्या आळेफाटा चौकात रांगाच रांगा, पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

रणजित गायकवाड

आळेफाटा (पुणे), पुढारी वृत्तसेवा : यंदा आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी दिसून आली. शनिवार, रविवारनंतर सोमवार आणि मंगळवारीदेखील सुट्टी जोडून आल्याने अनेकांनी पर्यटनस्थळी, गावाकडे जाण्यास पसंती दिली आहे. उद्या सुट्टीचा शेवटचा दिवस असल्याने सोमवारी दुपारनंतर पुण्याकडे परतणाऱ्या वाहनांच्या आळेफाटा चौकात लांबच लांब रांगा लागल्या आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सोडवताना आळेफाटा पोलिसांची दमछाक झाली.

पुणे -नाशिक महामार्गावरील आळेफाटा शहरांच्या बाजुने बायपासचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा मोठा भार आळेफाटा चौकातील रस्त्यांवर पडत आहे. अशातच वाहन चालकांच्या बेशिस्तीमुळे वाहतुक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागने नित्याचे झाले आहे. त्यातच पावसाळी वातावरण आणि शनिवार-रविवारची सुट्टी आणि त्यानंतर स्वातंत्र्यदिन आणि पारशी नवीन वर्ष अशा चार सुट्ट्या लागून आल्याने मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उद्या सुट्टीचा शेवटचा दिवस असल्याने सोमवारी दुपारनंतर पुण्याकडे परतणाऱ्या वाहनांच्या आळेफाटा चौकात सुमारे दोन ते अडीच किलोमीटर रांग दिसून आली. त्यामुळे स्थानिकांसह प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT