Latest

पीएफ व्याज दर जैसे थे!

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जीपीएफ, पीपीएफ, सीपीएफ, एआयएसपीएफ, एसआरपीएफ आणि एएफपीपीएफवरील व्याज दर कायम राहणार आहेत.

पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) केवळ सरकारी कर्मचार्‍यांना लागू होतो, तर इतर फंड निमसरकारी व खासगी कर्मचार्‍यांसाठी आहेत. आर्थिक व्यवहार मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाने जनरल पब्लिक फंड (जीपीएफ) आणि इतर योजनांसाठी ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी त्रैमासिक व्याज दर जाहीर केले. त्यानुसार आधीच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 1 ऑक्टोबरपासून जीपीएफ आणि तत्सम सर्व योजनांसाठी व्याज दर 7.1 टक्के राहील, असे आर्थिक व्यवहार मंत्रालयाने परिपत्रकात म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT