Latest

पी. एन., सतेज पाटील, अ‍ॅड. घोरपडे अखिल भारतीय काँग्रेस समितीवर

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्यपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील व अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय प्रदेश काँग्रेस समिती सदस्यांमधून अखिल भारतीय काँग्रेस समितीवर निवड केली जाते. अखिल भारतीय समितीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्यांची निवड केली जाते. या समितीमध्ये देशभरातून सुमारे एक हजार कार्यकर्त्यांचा समावेश असतो. एखाद्या प्रश्नावर भूमिका घेण्याचे तसेच निवडणुकीचे धोरण या समितीमध्ये निश्चित केले जाते.

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस अधिक बळकट आहे. सर्वाधिक काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तीन नेत्यांची निवड अखिल भारतीय पातळीवर करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT