Latest

पालकमंत्री-आ. राऊत यांच्यात शाब्दिक चकमक

backup backup

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील रस्त्याची सध्या दुरावस्था झालेली आहे. दुसरीकडे अनेक तालुक्यात विविध योजनांमधून रस्ते मंजूर आहेत. मात्र, ठेकेदार वेळेवर कामे पूर्ण करीत नसल्याने पूर्वी अस्तित्वात असलेले रस्ते ही खराब होत आहेत.त्यामुळे कामे अर्धवट आणि उशिरा करणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आली.

मंजूर रस्ते मात्र काम न सुरू झालेले, अर्धवट राहिलेले रस्ते यावर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आक्रमक दिसले, अधिकार्‍यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. याविषयात गोंधळ उडाला, आमदार राऊत यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये स्थानिक विषय मार्गी लागत नसतील तर काय उपयोग, अध्यक्ष म्हणून तुमचा काय फायदा या शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केला. या बोलण्यावर पालकमंत्री भरणे संतापले ते आपल्या जागेवरून उठले आणि राऊत तुम्ही खाली बसा, म्हणून सुनावले, यावर आ. राऊत यांनी ही पालकमंत्र्यांना सडेतोड बोलण्यास सुरुवात केली.

रस्ते या विषयावर बराच वेळ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मार्ग, पालखी मार्ग, मुरूम वाहतूक होणारे मार्ग, रस्ते मंजूर आहेत. मात्र, काम न सुरू झालेल्या रस्त्यावर आमदारांनी आवाज उठवला. अक्कलकोट तालुक्यातील रस्त्याचा विषय ही आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी उपस्थित करून बोगस कामाची चौकशी करण्याची मागणी केली. माळशिरस तालुक्यात ही विशिष्ट ठेकेदारांनाच रस्ते दिले जातात, त्यांच्याकडून वेळेत कामे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे मंजूर झाल्यापासून जवळपास पाच ते सहा वर्षे या रस्त्याची कामे चालू आहेत. संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि दंड वसूल करावा, अशी मागणी माळशिरसचे नेते उत्तम जानकर यांनी केली.

SCROLL FOR NEXT