Latest

पाटणा : 1.8 कोटी रुपये पगाराची ‘अ‍ॅमेझॉन’कडून ऑफर

Arun Patil

पाटणा ; वृत्तसंस्था : बिहारची राजधानी पाटणा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) मधील अभिषेक कुमार या विद्यार्थ्याला अ‍ॅमेझॉन या आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनीकडून तब्बल 1.8 कोटी रुपये पगाराची ऑफर देण्यात आली आहे.

अभिषेक हा कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी असून अद्याप तो अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अ‍ॅमेझॉनने कोडिंग परीक्षा घेतली होती. अभिषेकने ही परीक्षा दिली होती. परीक्षेत पात्र ठरल्यानंतर त्याने एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलाखतीच्या तीन फेर्‍या पूर्ण केल्या.

त्यानंतर अभिषेकला 21 एप्रिल रोजी अ‍ॅमेझॉन जर्मनीकडून नोकरीच्या ऑफरचा अंतिम कॉल आला. यात अभिषेकला विक्रमी 1.8 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. पाटणा एनआयटीसाठी हे वर्ष विक्रमी वर्ष ठरले असून संस्थेने 130 टक्के एकूण प्लेसमेंट मिळवले आहेत. कोरोनामुळे एनआयटीमधील कॅम्पस प्लेसमेंटला मोठा फटका बसला होता.

अभिषेकच्याआधी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आदिती तिवारी हिच्या नावावर सर्वाधिक पॅकेज मिळवण्याचा विक्रम होता. तिला फेसबुकने वार्षिक 1.6 कोटी रुपयांच्या पगाराचे पॅकेज दिले होते. आदितीच्या आधी सर्वाधिक पॅकेज मिळवण्याचा विक्रम पाटणाच्या संप्रीती यादव हिच्या नावावर होता. तिला 'गुगल'कडून 1.1 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT