न्यूयॉर्क : वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत भारताने पाकिस्तानवर ताशेरे ओढले. पाकिस्तानच्या वक्तव्यावर आम्ही प्रत्युत्तर देणार नाही. पाकिस्तानने आधी स्वतःच्या घरात बघावे. दहशतवाद्यांसाठी सताड उघडलेले दार पाकला दिसेल, असे भारताचे संयुक्त राष्ट्रांतील समुपदेशक प्रतीक माथूर यांनी सांगितले. तीन महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी रशिया-युक्रेन युद्धाची तुलना भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या काश्मीर वादाशी केली होती. त्यावर प्रतीक माथूर यांनी वरीलप्रमाणे मत नोंदवले. न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी संयुक्त राष्ट्रीय महासभेच्या 11 व्या आपत्कालीन सत्रादरम्यान माथूर बोलत होते.