Latest

परेडचा नजारा पहिल्यांदाच हवाई दलाच्या कॉकपिटमधून

निलेश पोतदार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)

73 व्या प्रजासत्ताकदिनी परेडचा समारोप भारतीय हवाई दलाच्या दिमाखदार 'फ्लायपास्ट'च्या (हवाई करामती) साक्षीने झाले. आजवर या हवाई करामती केवळ जमिनीवरून पाहता येत होत्या. पहिल्यांदाच हवाई दलाने हा नजारा थेट कॉकपिटमधून कॅमेराबद्ध केला.

फ्लायपास्टसाठी 59 कॅमेरे आणि 160 जवानांची तजवीज हवाई दलाने केली. फ्लायपास्ट अंतर्गत राफेल, जग्वार, सुखोई, सारंग, अपाचे, डकोटा, एमआय-17, चिनूक, डोर्नियर एअरक्राफ्ट सहभागी होते. सी-130 जे सुपर हरक्युलस विमानानेही उड्डाण घेतले.

फ्लायपास्टदरम्यान कॉकपिटमधून थेट प्रसारणासाठी दूरदर्शनसोबत समन्वय राखण्यात आला. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी याबद्दल दूरदर्शन आणि आकाशवाणीचे अभिनंदन केले.

SCROLL FOR NEXT