Latest

पक्ष्यांसोबत राहिल्याने सुधारते मानसिक आरोग्य

Arun Patil

लंडन : निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने मनाला शांती लाभते, असे म्हटले जाते. जर आम्ही पक्ष्यांसोबत राहिलो, त्यांना पाहिले, त्यांचा आवाज ऐकला तर आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते, असा त्याचा अर्थ होतो का? यासंदर्भातील नव्या संशोधनानुसार याचे उत्तर 'होय' असेच आहे.

ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार पक्ष्यांच्या सान्निध्यात असणे, त्यांना पाहणे, त्यांचा आवाज ऐकल्याने आपले मानसिक आरोग्य सुधारते. उल्लेखनीय म्हणजे याचा प्रभाव आठ तासांपर्यंत राहतो. एवढेच नव्हे तर नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकानांही याचा लाभ मिळतो.

लंडनमधील 'किंग्ज कॉलेज'च्या वतीने करण्यात आलेल्या या संशोधनानुसार पक्ष्यांच्या सान्निध्यात राहिल्याने मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय त्याचा अधिक लाभ नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकांनाही मिळतो. 'नैराश्य' हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. मात्र, या संशोधनातील निष्कर्षानुसार पक्ष्यांचे जीवन हे मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या लोकांचे जीवन अधिक सक्षम करण्यास उपयोगी ठरते. पक्षी व मानसिक आजार यासंबंधीचे हे संशोधन 'सायंटिफिक रिपोर्टस् जर्नल'मध्ये याच आठवड्यात प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संशोधनासाठी संशोधकांनी 'अर्बन माईंड' नामक स्मार्टफोन अ‍ॅप्लिकेशनचा वापर केला. अशा संबंधीचे हे पहिलेच संशोधन आहे.

SCROLL FOR NEXT