Latest

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून केले मिताली राजचे कौतुक

Arun Patil

नवी दिल्‍ली ; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' कार्यक्रमात स्टार महिला क्रिकेटर मिताली राजचे कौतुक केले. मितालीने महिन्याच्या सुरुवातीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. वयाच्या 16 व्या वर्षी पदार्पण करणारी मिताली तिच्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक सर्वाधिक सामने खेळणारी आणि सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. 'मन की बात' या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, मिताली राज ही महिलांसाठी प्रेरणा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' सांगताना म्हणाले की, क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने अनेक क्रीडा चाहत्यांना प्रभावित केले आहे. मिताली केवळ एक असामान्य खेळाडूच नाही तर अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. मी मितालीला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. 26 जून 1999 रोजी आयर्लंडविरुद्ध पदार्पण केल्यानंतर मितालीने 12 कसोटी सामन्यांमध्ये 43.68 च्या सरासरीने 699 धावा केल्या. 232 एकदिवसीय ज्यामध्ये तिच्या बॅटने 7805 धावा केल्या आणि 89 टी-20 ज्यामध्ये तिने 2364 धावा केल्या आहे. याचबरोबर पंतप्रधानांनी ग्रीसमधील जागतिक भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणार्‍या नीरज चोप्रा याचेही अभिनंदन केले.

मितालीचे पराक्रम

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे. मिताली राजने कर्णधार म्हणून दीर्घकाळ भारताचे नेतृत्व केले आहे. मितालीने 155 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाची धुरा सांभाळली, ज्यापैकी टीमने 89 सामने जिंकले आणि 63 सामने गमावले. तिने 8 कसोटी सामने आणि 32 टी-20 सामन्यांमध्येही कर्णधारपद भूषवले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT