नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहे. ग्लोबल लीडर 'अॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्ट'ने जारी केलेल्या यादीत पंतप्रधान मोदी यांनी 77 टक्के अॅप्रुव्हल रेटिंग प्राप्त करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना मागे टाकले आहे.
मॉर्निंग कन्सल्टने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 13 देशांमध्ये सर्वांत अधिक अॅप्रुव्हल रेटिंग पंतप्रधान मोदी यांना मिळाले आहे. पंतप्रधान मोदी 2020 ते 2022 पर्यंत बहुतांश महिन्यांत सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. या यादीत पंतप्रधान मोदी यांच्यानंतर मेक्सिकोचे पंतप्रधान मॅन्युएल लोपेझ दुसर्या स्थानावर आहेत. त्यांना 63 टक्के अॅप्रुव्हल रेटिंग मिळाले आहे. 54 टक्के रेटिंगसह इटलीच्या पंतप्रधान मारिया तिसर्या स्थानावर आहेत. त्यानंतर जपानचे पंतप्रधान फुफिओ किशिदा यांना 42 टक्के रेटिंग मिळाले
आहे.
या यादीत मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना पिछाडीवर टाकले आहे. बायडेन यांना 42 टक्के तर ट्रूडो यांना 41 टक्के अॅप्रुव्हल रेटिंग मिळाले आहे. तर ब्रिटनचे पंतप्रधान यादीत सर्वात तळात असून त्यांना केवळ 33 टक्के अॅप्रुव्हल रेटिंग मिळाले आहे.