Latest

नेहा धुपिया दुसऱ्यांदा आई होणार, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज!

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री नेहा धुपिया दुसऱ्यांदा आई होणार आहे. नेहा धुपिया हिने बेबी बंप फ्लॉन्ट करत आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची गुड न्यूज दिली आहे. नेहाने इंस्टाग्रामवर तिचा पती अभिनेता अंगद बेदी आणि मुलगी मेहर सोबतचा फॅमिली फोटो शेअर केला आहे.

अधिक वाचा :

नेहाने फोटो शेअर करत लिहिले आहे, 'कॅप्शन शोधण्यासाठी आम्हाला दोन दिवस लागले…आणि ज्या चांगल्या गोष्टींचा आम्ही विचार करु शकत होतो तीच हीच आहे…थँक्यू गॉड.'

नेहाच्या प्रेग्नेंसीच्या वृत्ताने सेलेब्स आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झा, भावना पांडे, फराह खान, रोहित रेड्डी यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी नेहा आणि अंगदला शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक वाचा :

फराह खानने स्माइलिंग इमोजी सोबत लिहिले आहे की, आता मी लोकांना सांगू शकते ना?.

इंस्टाग्रामवरील फोटोत नेहा ब्लॅक ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करत असल्याचे दिसते. या फोटोत अंगदने एका हातात मुलगी मेहरला हातात उचलून धरले आहे. तिघेही खुशीत असल्याचे दिसते.

नेहा पुन्हा चर्चेत…

नेहा पहिल्या प्रेग्नेंसीच्या दरम्यान देखील चर्चेत होती. आता तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची चर्चा सुरु आहे. मे २०१८ मध्ये अंगद आणि नेहाने गुपचूप लग्न केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न केल्याचे जाहीर करत सगळ्यांना आर्श्चयाचा धक्का दिला होता.

अधिक वाचा :

विशेष म्हणजे नेहाने लग्नाच्या सहा महिन्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये पहिली मुलगी मेहरला जन्म दिला होता.

नेहाने हिंदी सोबत पंजाबी, तेलुगू, मल्याळम आणि जपानी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. नेहाने २००२ मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. तर मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या अंतिम १० स्पर्धकांत तिची निवड झाली होती.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT