Latest

नेटफ्लिक्स बनवतेय मर्लिन मन्‍रोेचा बायोपिक

backup backup

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आता हॉलीवूड अभिनेत्री मर्लिन मन्‍रोवर बायोपिक बनवणार आहे. 'ब्लाँड' असे या बायोपिकचे नाव आहे. लवकरच हा चित्रपट रीलिज होणार आहे. अभिनेत्री अ‍ॅना डी अर्मास हिने यात मर्लिनची भूमिका साकारली होती. सध्या अ‍ॅनाचा मर्लिन मन्‍रो लूकदेखील व्हायरल झाला आहे आणि त्यात ती हुबेहुब मर्लिनसारखीच दिसते. 28 सप्टेंबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रीलिज होणार आहे. तत्पूर्वी, व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.

मर्लिन ही जगातील एक सुंदर महिला म्हणून ओळखली जात होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्याशी तिचे अफेयर असल्याचेही सांगितले जाते. तिचे खरे नाव नॉर्मा जीन असे होते. हॉलीवूडमधील करिअरमुळे लाईमलाईटमध्ये आयुष्य जगत असतानाही मर्लिन आतून मात्र समाधानी नव्हती. तिच्या आयुष्यातील ही काळी बाजूही या बायोपिकमध्ये पाहायला मिळणार आहे.

SCROLL FOR NEXT