Latest

नॅनो रोबो करणार दंत उपचारांना मदत

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली : चुंबकीय क्षेत्राचा उपयोग करून विकसित करण्यात आलेले नॅनो रोबो आता दंत नलिकांच्या आत जाऊन तेथील जीवाणूंना नष्ट करण्यासाठी मदत करतील. तसेच रूट कॅनल उपचाराच्या यशाचा दरही वाढवतील. भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) आणि त्यांच्या इनक्यूबेटेड स्टार्टअप-थेरानॉटिलसच्या संशोधकांनी हे नॅनो रोबो विकसित केले आहेत.

दातांमधील संक्रमणाच्या उपचारासाठी रूट कॅनल प्रक्रिया नियमित उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रक्रियेत दातांमधील संक्रमित नरम ऊतींना (पल्प) हटवले जाते आणि संक्रमणाला कारणीभूत जीवाणूंना नष्ट करण्यासाठी अँटिबायोटिक किंवा रसायनांच्या सहाय्याने दातांना फ्लश केले जाते. मात्र, अनेक वेळा तेथील जीवाणू पूर्णपणे नष्ट होत नाहीत. एंटरोकोकस फेकलिससारखे अँटिबायोटिक रोधक क्षमता असलेले जीवाणू यामध्ये प्रामुख्याने असतात जे दातांच्या सूक्ष्म दंतनलिकांमध्ये लपून राहतात.

आयआयएसच्या सेंटर फॉर नॅनो सायन्स अँड इंजिनिअरिंगचे रिसर्च असोसिएट षण्मुख श्रीनिवास यांनी सांगितले की दंतनलिका अतिशय लहान आकाराच्या असतात आणि बॅक्टेरिया त्यांच्या ऊतींमधील खोलीत लपून राहतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास प्रचलित पद्धत पुरेशी नाही. त्यामुळे संशोधकांनी आयर्न व सिलिकॉन डायऑक्साईडपासून असे हेलिकल नॅनोबॉट तयार केले जे कमी तीव—तेच्या चुंबकीय क्षेत्राला उत्पन्न करणार्‍या उपकरणाचा वापर करून नियंत्रित केले जाऊ शकतात. या नॅनोबॉटस्ना दंतनलिकांमध्ये सोडून तेथील जीवाणू नष्ट करता येणे शक्य होते.

SCROLL FOR NEXT