Latest

नाना पटोलेंकडून वादग्रस्त वक्तव्य; भाजप आंदोलनाच्या तयारीत

backup backup

नागपूर; पुढारी ऑनलाईन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांनी मी मोदीला मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे ते म्हणत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाजपने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, आपल्या वक्तव्याने वाद वाढल्यानंतर नाना पटोले यांनी खुलासा केला आहे.

माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो.

दरम्यान, नाना पटोले यांच्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्याविरोधा नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंदियामधील भाजप खासदार सुनील मेंढे यांनीही भंडारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून तक्रार दाखल

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री कूही पोलीस ठाण्यात दाखल केली.

देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांना अशी गंभीर धमकी देणारे नाना पटोले यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून बावनकुळे आणि इतर भाजपा नेत्यांनी पोलिसांना केली. यावेळी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा नेते आनंदराव राऊत, अजय बोढारे आणि पदाधिकारी- कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

पटोले विरोधात भाजपा आक्रमक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी पटोलेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला..नाना पटोलेंच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय… नागपुरातल्या कॉटन मार्केट परिसरात हातात बॅनर घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT