Latest

दै. ‘पुढारी’-टोमॅटो एफएम शॉपिंग उत्सवचा दुसरा साप्ताहिक लकी ड्रॉ उत्साहात

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लाखो रुपयांची बक्षिसे जिंकून देण्याची संधी मिळालेल्या दै. 'पुढारी'-टोमॅटो एफएम आयोजित 'शॉपिंग उत्सव 2022' या योजनेच्या दुसर्‍या साप्ताहिक लकी ड्रॉचे विजेते अर्धा तोळा सोन्याचे मानकरी रविवार पेठेतील संतोष कुईगडे आणि रमणमळा येथील राधिका निंबाळकर ठरले आहेत. राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स येथे हा लकी ड्रॉ गुरुवारी काढण्यात आला. सोन्याचे मानकरी ठरलेले संतोष कुईगडे आणि राधिका निंबाळकर यांनी मे. गोपीनाथ अनंत चिपडे या दुकानातून खरेदी केली आहे.

महेंद्र ज्वेलर्सचे भरतभाई ओसवाल, कुशल ओसवाल, एस. एस. मोबाईलचे अतुल भांड, तनिष्कचे बाबू जाधव, मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफचे प्रेम चिपडे, हेडा एंटरप्राईजेसचे योगेश हेडा, बालाजी कलेक्शनचे प्रकाश पोकळे यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. यावेळी दै. 'पुढारी'चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, जाहिरात व्यवस्थापक (शहर) अतुल एकशिंगे, जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) जावेद शेख, सहायक जाहिरात व्यवस्थापक रिया भांदिगरे यांच्यासह जाहिरात प्रतिनिधी व ग्राहक उपस्थित होते.

लकी ड्रॉमधील विजेते पुढीलप्रमाणे –

प्रथम क्रमांक : राधिका निंबाळकर (कु. नं. 10015), संतोष कुईगडे (कु. नं. 34792)
द्वितीय क्रमांक : सार्थक कणिरे (कु. नं. 40603), सुहास यादव (कु. नं. 20085),
तृतीय क्रमांक : उत्तम हेगडे (कु. नं. 35441), विजय शिंदे (कु. नं. 27625), मंदार बेलवलकर (कु. नं. 21738), लीना काटकर (कु. नं. 34671), रावसाहेब घाटगे (कु. नं. 48613),

घटस्थापनेपासून म्हणजेच 26 सप्टेंबरपासून तुळसी विवाहापर्यंत सुरू असलेल्या या योजनेत सहभागी दुकानांतून खरेदी करणार्‍या ग्राहकांना कुपन दिले होते. या योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. या लकी ड्रॉमध्ये सोने, वॉशिंग मशिन, स्मार्ट फोन, ब्लेंडर, हेडफोन व सरप्राईज गिफ्ट या बक्षिसांठी विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. या योजनेसाठी एस. एस. मोबाईल हे मुख्य प्रायोजक, तर तनिष्क हे सहयोगी प्रायोजक आहेत. गिरीश सेल्स, महेंद्र ज्वेलर्स, स्फूर्ती, चिपडे सराफ, वारणा बँक व राजाकाका ई मॉल हे सहप्रायोजक आहेत.

सोने खरेदीतून सोने बक्षीस लागल्याने आनंद : कुईगडे

यावर्षी दिवाळीत मुलगी आणि पत्नीसाठी सोने खरेदी केली होती. या खरेदीतून बक्षिसाच्या रूपाने पुन्हा सोने मिळाल्याचा आनंद आहे. नागरिकांना सकाळी चहासोबत दै. 'पुढारी'च हवा असतो. ही कोल्हापूरची खासियत बनली आहे. त्यामुळे 'पुढारी' वाचूनच दिवसाची सुरुवात होते, अशी प्रतिक्रिया संतोष कुईगडे यांनी व्यक्त केली.

दिवाळीचे मोठे गिफ्ट : निंबाळकर

लकी ड्रॉमध्ये बक्षीस मिळाले, यावर विश्वासच बसत नाही. अनेक ठिकाणी ड्रॉ काढले जातात. मात्र, कधी बक्षीस लागेल याची खात्री नव्हती. कोल्हापुरात खरेदीच्या निमित्ताने दै. 'पुढारी' च्या योजनेतून आम्हाला दिवाळीचे मोठे गिफ्ट मिळाले आहे. याचा आनंद शब्दांत वर्णन करता येत नाही, अशा शब्दांत राधिका निंबाळकर यांनी भावना व्यक्त केल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT