Latest

देशातील पेट्रोल, डिझेलचे दर ११ महिन्यांपासून स्थिर; ‘एटीएफ’च्या किंमतीत ४ टक्क्यांची कपात

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत किरकोळ घट झाल्याने, विमान इंधनात अर्थात एटीएफच्या किंमतीत आज बुधवारी (दि.०३) ४ टक्क्यांची कपात करण्यात आली. दरम्यान गत ११ महिन्यांपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. परकीय चलन दरानूसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एटीएफच्या किमतीत बदल केला जातो.

सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनूसार, राष्ट्रीय राजधानीत एविएशन टरबाइन फ्यूलची (एटीएफ) किंमत ४ हजार ६०६ रुपये प्रति किलोलीटर म्हणजेच ४.०९ टक्क्यांनी घटवून १,०७,७५०.२७ रुपये प्रती किलोलीटर करण्यात आली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात एटीएफच्या किमतीत वाढ करण्यात आल्यानंतर ती १,१२,३५६.७७ रुपये प्रति किलोलीटर करण्यात आली होती.

नवीन दरानूसार आता कोलकाता मध्ये एटीएफचे दर १,१५,०९१.३३ रुपये, मुंबई १,०६,६९५.६१ रुपये आणि चेन्नईत १,१२,४९७.९९ रुपये प्रति किलोलीटर पर्यंत पोहचले आहेत. जानेवारी महिन्यात एटीएफचे दर १,१७,५८७.६४ रुपयांनी घटवून १,०८,१३८.७७ पर्यंत आणण्यात आले होते. तर, १ डिसेंबर आणि १ नोव्हेंबर २०२२ मध्ये अनुक्रमे २.३% आणि ४.१९ टक्क्यांची कपात करण्यात आली होती.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT