Latest

देशातील अनेक भागातील पारा १.६ ते ३.० अंशांनी वाढला!

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  देशात यावेळी फेब्रुवारी महिन्यातच तापमान वाढ झाल्याचे दिसून येत आहे. देशातील काही भागात कमाल तापमानात वाढ होत असून पर्वतराजीलाही उन्हाचा तडाखा बसत आहे. देशातील काही भागात सामान्य तापमानापेक्षा १.६ ते ३.० अंश सेल्सिअसने वाढल्याचे हवामान खात्याने सांगितले.

हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलाचाही पारा वाढला असून पंजाब आणि पश्चिम राजस्थानातील अनेक ठिकाणी हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि गुजरातमध्ये कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. राजधानी दिल्लीचे किमान तापमान ११.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. सिमलामधील १८ फेब्रुवारीला कमाल तापमान २३.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दुसरीकडे शनिवारी उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील काही भाग, महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेशातील तापमान सामान्य तापमानापेक्षा १.६ ते ३.० अंश सेल्सिअसने वाढले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT