Latest

दुर्गमानवाड पठारावर बॉक्साईटचे उत्खनन; रात्रीत माल पसार

Arun Patil

राशिवडे ; पुढारी वृत्तसेवा : दुर्गमानवाड (ता. राधानगरी) परिसरातील पठारावर बॉक्साईट चोरी होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या ठिकाणचा पंचनामा मंडल अधिकारी संजय गीते यांनी केला. उत्खनन झाल्याचे दिसून आले; परंतु माल मात्र सापडला नाही. त्यामुळे महसूल विभाग नेमका करतो तरी काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कित्येक दिवसांपासून बॉक्साईटचे अनेक ट्रक भरून जात होते. सर्वसामान्य नागरिकांना याची कल्पना होती; पण यामध्ये काही स्थानिकांचा सहभाग असल्याने वाच्यता होत नव्हती. चाफेवाडी, धुमाळवाडी येथून रात्रीच्या वेळी उत्खनन करून अवैधपणे बॉक्साईट वाहतूक होत होती. हे ट्रक गारगोटीच्या दिशेने भरून जात असल्याची चर्चा आहे. दिवसभर जेसीबीने बॉक्साईटचे दगड काढून रात्रीच्या वेळी ट्रक भरण्याचे काम केले जात होते.

SCROLL FOR NEXT