Latest

दुबई मध्ये साकारतेय भव्य मंदिर

अमृता चौगुले

दुबई ः संयुक्‍त अरब अमिरातमधील दुबई शहरात देशातील दुसरे हिंदू मंदिर उभे राहत आहे. त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. अबुधाबी येथील 'बीएपीएस' हिंदू मंदिरानंतर आता हे दुसरे भव्य मंदिर उभे राहत आहे. 82 हजार चौरस फूट जागेत उभ्या राहत असलेल्या या मंदिरात एकाच वेळी दीड हजारपेक्षा अधिक भाविक दर्शन घेऊ शकतील.

हिंदू संस्कृतीला वेद-उपनिषदांचा पाया आहे. ऋग्वेदात 'एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति' (एकाच परमसत्याला लोक वेगवेगळ्या नावाने ओळखतात) असे म्हटले आहे तर श्‍वेताश्‍वतर उपनिषदात 'एको देवाः सर्व भूतेषु गूढः' (एकच परमेश्‍वर सर्व भूतमात्रांमध्ये व्यापून राहिलेला आहे) असे म्हटले आहे. 'सर्वम खलु इदम ब—ह्म' (हे सर्व काही खरोखरच एक ब—ह्म म्हणजेच परमात्माच आहे) अशीही उपनिषदांची वाणी आहे. हे एकच निराकार ब—ह्म वेगवेगळ्या नाम-रूपांमध्येही नटले आहे अशी भारतीय संस्कृतीची धारणा आहे. त्यामुळे दुबईतील या हिंदू मंदिरातही एकाच परमेश्‍वराची वेगवेगळी रूपे असलेल्या पंधरा देवदेवतांच्या सुंदर मूर्ती असतील.

मंदिराचे बाहेरील डिझाईन हे पारंपरिक अबरबी डिझाईन 'मशरबिया'पासून प्रेरित आहे. मंदिराचा अंतर्भात भारतीय मंदिरांसारखाच; पण आधुनिक 'टच' असलेला असेल. मंदिराचा प्रार्थना हॉल 5 हजार चौरस फूट जागेत बनवला जात आहे. खांबांचे डिझाईन हे गुजरातच्या सोमनाथ मंदिरापासून प्रेरित आहे. मंदिराचे शिखर नागर शैलीतील असून मंदिराची एकूण उंची 24 मीटर असेल. बाहेरील स्टोन क्लॅडिंगसाठी सौदी अरेबिया आणि जॉर्डनमधून दगड मागवले जात आहेत. मंदिराचे सरव्यवस्थापक गोपाल कोकानी यांनी सांगितले की मंदिर निर्मितीसाठी 550 कोटी रुपये खर्च येईल. ते पूर्णपणे बनल्यावर दुबईच्या प्रसिद्ध शेख झायेद रस्त्यावरून त्याचे सर्वोच्च पितळी शिखर दिसेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT