Latest

दाजीपूर अभयारण्य 31 डिसेंबर, 1 जानेवारीला पर्यटकांसाठी बंद

Arun Patil

राधानगरी, पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य हे 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत दोन दिवस पर्यटक व अभ्यासक यांना बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एच. एस. पद्मनाभा यांनी दिली.

राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्याला दरवर्षी महाराष्ट्रातून हजारो पर्यटक भेट देत असतात. दि. 31 डिसेंबर वर्षाअखेर व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन्यजीव विभागाने या दोन दिवसांसाठी हेे अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे, मद्यपान करणे, गाणी वाजवणे, प्लास्टिक कचरा करणे, हुल्लडबाजी करणार्‍या पर्यटकांवर वन्यजीव कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या दोन दिवसांत पर्यटनाला बंदी असल्याने पर्यटकांनी अभयारण्यात येऊ नये, असे आवाहन वन्यजीव विभागाने केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT