नैरोबी : आफ्रिकेतील स्वाझीलँड या देशात अद्यापही राजेशाही आहे आणि तेथील राजाच्या विलासी जीवनाबद्दल जगभर चर्चा असते. हा राजा दरवर्षी नवे लग्न करतो. स्वतः ऐषोरामात राहणार्या या राजाची बहुतांश प्रजा मात्र गरिबीने गांजलेली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यास पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या मस्वाती तृतीय नावाच्या राजाने 2018 मध्ये देशाचे नाव बदलून 'द किंगडम ऑफ इस्वातीनी' असे केले. हा देश दक्षिण आफ्रिका आणि मोझांबिकच्या जवळ आहे. या देशात दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात महाराणीच्या आईचे शाही गाव लुदजिजिनी येथे उम्हलांगा सेरेमनीचे आयोजन केले जाते.
त्यामध्ये दहा हजारांपेक्षाही अधिक तरुणी सहभागी होतात. या अविवाहित तरुणींना राजासमोर नृत्य करावे लागते. त्यामधून एक तरुणी निवडून राजा तिच्याशी लग्न करतो. या परंपरेला देशातील अनेक तरुणींनी विरोधही केला होता. मात्र, ज्या तरुणींनी विरोध केला त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दंड आकारण्यात आला.