Latest

द एलिफंट व्हिस्परर्स 39 मिनिटांचा; तयार करायला लागली 5 वर्षे

दिनेश चोरगे

चेन्नई; वृत्तसंस्था : गुनीत मोंगा निर्मित कार्तिकी गोन्साल्वीस दिग्दर्शित 'द एलिफंट व्हिस्पर्स' हा माहितीपट म्हणजे बोमन आणि बेली या जंगलात राहणार्‍या एका दक्षिण भारतीय जोडप्याची आणि त्यांनी रघू हे नाव ठेवून मुलाप्रमाणे वागविलेल्या हत्तीची सत्यकथा आहे. बोमन आणि बेली मिळून एका अनाथ हत्तीबाळाची काळजी वाहतात आणि तिघांचे एक कुटुंबच तयार होते. रघू जणू त्यांचेच मूल बनतो. मनुष्य आणि प्राण्यात फुललेले भावनिक नाते या लघुपटातून उलगडण्यात आले आहे.

39 मिनिटांचा हा लघुपट तयार करायला पाच वर्षे लागली. एकूण 450 तासांचे फुटेज या दरम्यान दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस आणि निर्मात्या गुनीत मोंगा यांनी कॅप्चर केले. हत्तीच्या पिलाचे एका दाम्पत्याने केलेले संगोपन सलग 5 वर्षे टिपणे म्हणजे गंमत नाही. या लघुपटासाठी दोघींनी घेतलेली मेहनत खरोखर फार मोठी आहे. लघुपटाची कथा दक्षिण भारतीय जोडपे बोमन आणि बेली तसेच त्यांनी वाढविलेल्या रघू नावाच्या अनाथ हत्तीभोवती फिरते. डॉक्युमेंट्री मूळ तमिळ भाषेत तयार करण्यात आली होती. 8 डिसेंबर 2022 रोजी ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. करण्यात आली. बेबी एलिफंट रघूसोबत घालवलेले सर्व क्षण कॅमेर्‍यात कैद केले गेले. रघूचे शॉट कॅप्चर करण्यासाठी त्याला नारळाचा कूट खायला न्यावा लागे. नारळकूट बघताच तो आनंदाने उड्या मारायचा आणि ते क्षण रेकॉर्ड केले जायचे. लघुपटात भावकथेसह जंगल आणि निसर्गाचे सौंदर्यही टिपण्यात आले आहे. लघुपट तामिळनाडूमधील मदुमलाई रिझर्व्ह या वनक्षेत्रात शूट केला आहे.

बोमन, बेली आणि रघूची प्रत्येक गोष्ट मी टिपली. मला तिघांमध्येही एक अद्भुत नाते दिसून आले. दोघे मानव एक हत्तीचे आई-बाबा बनले. तेही अगदी सख्खे!
– कार्तिकी गोन्साल्वीस, दिग्दर्शिका

दोन महिलांनी मिळून ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. मी यामुळे अधिक आनंदात आहे. मी हा पुरस्कार समस्त भारतवासीयांना अर्पित करते.
– गुनीत मोंगा, निर्माती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT