अॅमस्टरडॅम : 'तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही?' असा सवाल आपण काहीही बरळणार्या व्यक्तीला करीत असतो. खरे तर कुणाच्याच जिभेला हाड नसतं ती गोष्ट वेगळी! नाकाचे मात्र असे नसते. नाकात खरोखरच हाड असते. मात्र, आता एका अशा तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे जिच्या नाकाला हाडच नाही. ती आपले नाक हवे तसे वळवू शकते!
आजवर आपण अनेक रिअॅलिटी टॅलेंट शामिध्ये अनेक स्पर्धक आपल्या शरीराची लवचिकता दाखवत असल्याचे पाहिले असेल. कधी कधी तर या मंडळींना बघून यांच्या शरीरात हाडं आहेत की नाही असाश्श्निच पडतो. एकदा एका टीव्ही शोमध्ये अभिनेत्री आलिया भट हिनेसुद्धा आपल्या हाताची लवचिकता दाखवून अनेकांना थक्क केलं होतं, आता अशाच या कमालीच्या 'फ्लेक्सिबल' तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आश्चर्य म्हणजे हात, पाय, कंबरेची लवचिकता नाही तर या तरुणीने स्वतःच्या नाकाची हालचाल करून अनेकांना थक्क केले आहे. नेदरलँडस्मधील रोमाना ब्रुंटजेस या तरुणीला जन्मतःच नाकाचे हाड नव्हते. अलीकडेच तिने आपल्या या हाड नसलेल्या नाकाने काही प्रकार करून दाखवले. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही आहे. रोमाना ही या व्हिडीओमध्ये आपल्या बोटाने नाक दाबते आणि आश्चर्य म्हणजे नाकाला हाड नसल्याने तिचे नाक पूर्ण सपाट होते.