Latest

तब्बल 100 कोटींच्या हेलिकॉप्टरचे मालक

अमृता चौगुले

तिरुवनंतपूरम : आरपी ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष बी. रवी पिल्लई यांनी एक हेलिकॉप्टर खरेदी करून आपल्या नावाची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये केली आहे. शंभर कोटी रुपयांच्या 'एअरबस एच 145' हेलिकॉप्टरचे मालक बनणारे ते पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहे. 68 वर्षांचे रवी पिल्लई सध्या 2.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक आहेत.

रवी पिल्लई यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुमारे 70 हजार कर्मचारी आहेत. मध्य पूर्वेतील सर्व देशांमध्ये पिल्लई यांना रस आहे. केरळमध्ये त्यांचे अनेक लक्झरी हॉटेल आहेत आणि आता त्यांचे हे हेलिकॉप्टर पर्यटनाला अधिक चालना देणारेही ठरले आहे. या अत्याधुनिक हेलिकॉप्टरमध्ये सर्व अद्ययावत सुविधा आहेत. सात प्रवासी आणि पायलटला घेऊन जाण्याची क्षमता यामध्ये आहे.

समुद्रसपाटीपासून 20 हजार फूट उंचीवरून उतरण्याची आणि टेकऑफ करण्याची क्षमताही त्यामध्ये आहे. अब्जाधीश असूनही 'लो प्रोफाईल' राहण्याबाबत रवी पिल्लई यांना ओळखले जाते. त्यांनी उदारहस्ते दिलेल्या देणग्या तसेच त्यांचे विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांशी असलेले जवळचे संबंधही चर्चेत असतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT