Latest

ट्रान्स नवर्‍याची सिझेरियन प्रसूती; बाळाचा जन्म!

दिनेश चोरगे

कोझिकोडे :  केरळच्या ट्रान्सजेंडर जोडप्याला बुधवारी कोझिकोड येथील शासकीय रुग्णालयात बाळ झाले. देशातील अशी ही पहिलीच घटना आहे. सकाळी 9.30 वाजता सिझेरियनद्वारे बाळाचा जन्म झाला, असे झिया पावल हिने वृत्तसंस्थेला सांगितले.

बाळ आणि बाळाला जन्म देणारा तिचा जोडीदार जहाद दोघांचीही प्रकृती उत्तम आहे, असेही झिया म्हणाली. जन्माला आलेले बाळ मुलगा की मुलगी ही बाब मात्र तिने अद्याप उघड केलेली नाही. झिया ही व्यावसायिक नर्तकी आहे. तिने 4 फेब्रुवारी रोजी तिचा जोडीदार जहाद हा 8 महिन्यांचा गर्भवता असल्याचे जाहीर केले होते. हे जोडपे गेल्या 3 वर्षांपासून एकत्र राहत आहे. जहाद हा स्त्रीपासून पुरुष बनण्याचे उपचार घेत असताना मूल होणार म्हणून ही उपचार प्रक्रिया थांबविण्यात आली. जिया हा पुरुष होता. त्याने मुलगी बनण्याची प्रक्रिया सुरू केली. जहाद हा मुलगी होता त्याने मुलगा बनण्याची प्रक्रिया सुरू केली. जहाद मुलगा बनल्यावरही गरोदर राहिला. जहादच्या गर्भधारणेमुळे या जोडप्याला लिंग बदलाची प्रक्रिया मध्येच थांबवावी लागली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT