Latest

टीईटी परीक्षा प्रवेशपत्रावर सनी लिओनीचा बोल्ड फोटो

अनुराधा कोरवी

बंगळूर ः कर्नाटकातील शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर सनी लिओनीचे अश्लील छायाचित्र छापण्यात आले आहे. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले.

काँग्रेसने प्रवेशपत्राचा स्क्रीनशॉट ट्विट केला आहे. जो पक्ष विधानसभेत ब्ल्यू फिल्म पाहतो, त्याच्याकडून आपण काय अपेक्षा करू शकतो, असे सरकारवर निशाणा काँग्रेसने साधला. दरम्यान,काँग्रेसच्या आरोपावर कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी. सी. नागेश म्हणाले की, परीक्षा अर्ज भरताना उमेदवार स्वतःचे छायाचित्र लावतो. नव्याने उजेडात आलेल्या प्रकरणात शिक्षण विभागाचा कोणताही दोष नाही. हे प्रवेशपत्र एका मुलीचे आहे.

SCROLL FOR NEXT