Latest

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत बिघडली

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत बिघडली असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना आयसीयूत शिफ्ट केले आहे. त्या तीन दिवसांपासून हिंदुजा रुग्णालयात दाखल आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, सायरा या ७७ वर्षांच्या आहेत. त्यांना तीन दिवस आधी हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. उच्च रक्तदाबाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तब्येत बिघडल्याने त्यांना आईयसीयूमध्ये दाखल केल्याची माहिती समोर येतेय.

हिंदी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि सायरा यांचे पती दिलीप कुमार यांचे ७ जुलै, २०२१ रोजी निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते.

SCROLL FOR NEXT