Latest

जर्मनीत धावली हायड्रोजनवरील पहिली प्रवासी ट्रेन

Arun Patil

बर्लिन : हायड्रोजनच्या सहाय्याने चालणारा जगातील पहिला प्रवासी ट्रेन नेटवर्क जर्मनीच्या लोअर सॅक्सोनी राज्यात सुरू करण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी अशा ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. फ्रेंच कंपनी 'एल्सटॉम'ने बनवलेल्या अशा हायड्रोजन फ्युएल सेल ड्राईव्हच्या चौदा ट्रेन्स आता डिझेल ट्रेनची जागा घेतील, असे स्थानिक परिवाहन प्राधिकरणाने म्हटले आहे. या नव्या ट्रेनपैकी पाच आता सुरू करण्यात आल्या असून अन्य ट्रेन वर्षअखेरीस सुरू केल्या जातील.

लोअर सॅक्सोनीचे मंत्री स्टिफन वेइल यांनी सांगितले की ही परियोजना जगभरात एक रोल मॉडेल आहे. जागतिक तापमानवाढ, हवामान बदल अशा समस्यांच्या पार्श्वभूमीवर जीवाश्म इंधनांचा वापर न करता पर्यावरणास पूरक अशा प्रकारच्या हायड्रोजन ट्रेन जागतिक प्रयत्नात मैलाचा दगड ठरल्या आहेत. या योजनेचा एकूण खर्च सुमारे 93 दशलक्ष युरो आहे. अशा रेल्वेंची रेंज एक हजार किलोमीटर आहे. हायड्रोजनच्या केवळ एका टँकच्या सहाय्याने दिवसभर त्या धावू शकतात. या ट्रेनमुळे 1.6 दशलक्ष लिटर डिझेलची बचत होईल आणि अशाप्रकारे प्रतिवर्ष कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात 4400 टनांची घट होईल. या ट्रेनचा कमाल वेग ताशी 140 किलोमीटर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT